आज आपल्या नात्याला ६ महिने पूर्ण झाले… ❤️
या सहा महिन्यांत तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझं ते लाडात येणं, माझ्यावर एखाद्या लहान बाळासारखं प्रेम करणं, माझे लहान बाळासारखे लाड पुरवणं, दुःखाच्या प्रत्येक क्षणी मला सावरणं आणि माझ्यावर अगणित प्रेम करणं… या सगळ्यामुळे माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर झालं आहे. ❤️
ज्या आयुष्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, असं जगातलं सगळ्यात सुंदर आणि भारी आयुष्य मला तुझ्यामुळे जगायला मिळत आहे. तू फक्त माझी बायको नाहीस, तर माझ्यासाठी देवी आहेस. माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर वरदान आहेस. 🥹❤️
अशीच आपण एकमेकांची सावली बनून आयुष्यभर सोबत राहूया. एकमेकांचा हात कधीही न सोडता, हसत-खेळत, भांडत-रुसत आणि एकमेकांवर असंच भरभरून प्रेम करत म्हातारे होऊया. आयुष्यातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने खास बनवूया आणि रोज नव्या नव्या आठवणींची सुंदर शिदोरी जमवूया. ❤️
Happy 6 Months Anniversary, माझ्या बायको, माझ्या राणी, माझ्या दुनिये, माझ्या सर्वस्व! ❤️😘
तुझ्यावर आज जितकं प्रेम आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम उद्याही असेल… आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहील. तू आहेस म्हणून माझं आयुष्य पूर्ण आहे! ❤️
I love you so much mazya baiko! ❤️😘